सीआरझेडचा भंग करून भराव

By Admin | Updated: March 24, 2017 00:56 IST2017-03-24T00:56:16+5:302017-03-24T00:56:16+5:30

येथील मुंबई अहमदाबाद महामार्ग परीसरात राजरोसपणे सीआरझेड कायद्याचा भंग करून जेसीबी वापरून मातीचा भराव घालणे सुरु आहे.

Fill the CRZ violation | सीआरझेडचा भंग करून भराव

सीआरझेडचा भंग करून भराव

मनोर : येथील मुंबई अहमदाबाद महामार्ग परीसरात राजरोसपणे सीआरझेड कायद्याचा भंग करून जेसीबी वापरून मातीचा भराव घालणे सुरु आहे.
याबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने थेट प्रांताधिकारी गजरे यांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर त्यांनी लेखी तक्रार करा मग बघू असे उत्तर देऊन सदर विषयाबाबत आपले धोरण स्पष्ट केले. हा भाग मनोर अधिकारी कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येतो. मनोर, मस्तान नाका, चिल्हार बोईसर रस्त्यालगत सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या जमिनीवर बांधकामे झाले असून नव्याने काही ठिकाणी ती आजही सुरु आहेत. बिनशेती (एन.ए.) परवानगी मिळालेली नसतांना तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने बिल्डर लॉबी आपले उखळ पांढरे करीत असून यात सर्वसामान्यांची मोठी फसवणूक सुरु आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन्ही बाजूला असलेल्या आदिवासी जमिनींवर बांधकामे सुरु आहेत. हलोली, चिल्हार, दुर्वेस, वेलगाव, बेलपाडा व टेन या ठिकाणी माती भरावाची कामे सुरु आहेत. येथे महसूल विभागाकडून अर्धवट रॉयल्टी घेतली जात आहे. ही बाब मंडळ अधिकारी बार्वे यांच्या निर्देशनात आणून दिली असता ‘मी बघतो, तलाठ्यांना सांगतो’ असे सरकारी उत्तर देऊन कोणतीही कारवाई करत नाहीत.
प्रांत अधिकारी विकास गजरे पालघर यांना व तहसिलदार महेश सागर यांना महसूल भवनांचा उदघाटन वेळी ही बाब पत्रकारांनी लक्षात आणून दिली होती. त्यावर कारवाई करू असे मोघम उत्तर त्यांनी दिले. (वार्ताहर)

Web Title: Fill the CRZ violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.