कॅन्सरशी लढा देतानाही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मायबोलीची सेवा सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:01 AM2021-05-26T09:01:35+5:302021-05-26T09:02:50+5:30

Father Francis Dibrito: फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर जानेवारी २०२० मध्ये पाठीच्या दुखण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते.

Father Francis Dibrito's MyBoli service continues despite fighting cancer! | कॅन्सरशी लढा देतानाही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मायबोलीची सेवा सुरूच!

कॅन्सरशी लढा देतानाही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मायबोलीची सेवा सुरूच!

googlenewsNext

वसई : ९३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे सध्या कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत असून, मी यातून लवकरच बरा होईन आणि मायबोलीच्या सेवेचे कार्य पूर्ण करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर जानेवारी २०२० मध्ये पाठीच्या दुखण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते. त्यातून त्यांनी हळूहळू उभारी घेतली, मात्र साधारण मार्च २०२१ मध्ये त्यांना पुन्हा वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या निरनिराळ्या तपासण्या केल्या, बायोप्सी केली. 

दरम्यान, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुर्दैवाने संपूर्ण वर्ष फादर दिब्रिटो यांचे उपचारात व डॉक्टरांनी घातलेल्या मर्यादा पाळण्यात गेले. तरीही साहित्य संवर्धन व मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यभर फिरून, स्वतःच आखलेला नियोजित कार्यक्रम राबविता न आल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी फोनवर बोलून दाखवली.

मी लवकरच बरा होऊन, राहून गेलेले मायबोलीच्या सेवेचे कार्य माझ्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, फादर दिब्रिटो यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे औषधोपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु ही व्याधी पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. 

मी आता बरा 
आहे. लवकरच पूर्ण बरा होईन. आपल्या सद्‌भावना पाठीशी आहेत.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फादर कुणालाही भेटू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते कोणाला भेटू इच्छित नसल्यामुळे आपल्या सद्‌भावना फादर दिब्रिटो यांच्या पाठीशी असू द्याव्यात.
- फा. रेमण्ड रुमाव, फादर दिब्रिटो यांचा भाचा

Web Title: Father Francis Dibrito's MyBoli service continues despite fighting cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.