अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By Admin | Updated: August 15, 2015 22:42 IST2015-08-15T22:42:26+5:302015-08-15T22:42:26+5:30
जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
जव्हार : जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली असूनसुद्धा आजपावेतो तेथे वीजपुरवठा, रस्ते, पाण्याची सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या सुविधा मिळण्याकरिता अलताफ शेख व आसरानगर गाव समिती अध्यक्ष रवी लाखन यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या सर्व तालुक्यांचा महसूल तथा इतर सर्व विभागांच्या प्रशासकीय कामाचा कारभार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार येथूनच करावा. येथून नेलेली खाती परत जव्हारलाच सुरू करावी. डोमिहीरा (खडखड) धरण प्रकल्पबाधितांच्या आसरानगर या गावाला महसुली दर्जा देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरू करून येथील आदिवासी जनतेला समाजमंदिर आणि स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. जव्हार एसटी स्टॅण्डच्या आवारात पत्र्यांच्या कम्पाउंडमधून अंबिका चौक, गांधी चौक, रिझवी मोहल्ला येथील वयोवृद्ध प्रवाशांकरिता येण्याजाण्यासाठी ५ फुटांचा रस्ता मोकळा करावा. जमीन घोटाळा करून जनतेची व प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या भूमाफिया, तलाठी, दुय्यम निबंधक यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, आदींसाठी हे उपोषण आहे असे सांगितले. (वार्ताहर)