शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

लाकडी नांगरवापराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:16 IST

पॉवर टिलरचा वाढता वापर : शेती होते आधुनिक पद्धतीने

शशिकांत ठाकूरकासा : पावसाळा आला की, ग्रामीण भागात जागोजागी शेतीची कामे सुरू असलेली दिसतात. हिरवीगार शेती आणि पेरणी, चिखळणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºया शेतकऱ्यांचा आवाज व सोबतच सतत नांगर ओढणारी बैलांची जोडी, हे दृश्य नेहमीचेच. मात्र, काळानुसार शेतीच्या पद्धतीमध्येही बदल झाला असून आजच्या आधुनिक काळात बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पॉवर टिलर’ वापराकडे वळताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा तसेच शारीरिक श्रम देखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाºया शेतकºयांना ४०० रूपये प्रती तास भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. पॉवर टिलरच्या वापरामुळे बैलगाड्या आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकºयांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात.सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ४५ हजारांवर पोहोचली आहे. तसेच भाडेतत्त्वावर बैलजोड्याही नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे त्यासाठी एखाद्या गुराखी ठेवावा लागतो. तसेच बैलांना चारा, खाद्य पुरविणे या गोष्टी शेतकºयांना वर्षभर कराव्या लागतात. तसेच पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकºयांना आणि महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शसनाच्या कृषी विभागाकडून मिळते.खेड्यापाड्यातील शेतकरी म्हटला म्हणजे त्याच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या, बैलगाडी ही असणारच असा समज. जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाºया फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकºयांची लगबग सुरू होते. शिवाय, नांगर मजबूत टिकाऊ असावा, यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर यासारख्या झाडाच्या लाकडाचा वापर करतात. 

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार