कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 00:25 IST2019-09-18T00:25:03+5:302019-09-18T00:25:09+5:30
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखवून पालघर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवले.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक
नालासोपारा : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखवून पालघर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवले. यामुळे कंपनीचे संस्थापक, संचालक, भागीदारांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याची चर्चा आहे.
सांगली राज्यातील इस्लामपूर येथील रयत अॅग्रो इंडिया प्रा.लि. कंपनी आणि त्यानंतर या कंपनीचे नामांतर करून त्याचे महारयत अॅग्रो इंडिया असे नाव झाले. या कंपनीत संस्थापक व अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते, भागीदार विजय शेंडे आणि इतर कंपनीचे भागीदार यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील अजित गंगाराम वझे यांच्याकडून ३ लाख ७५ हजार, वाणगाव येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्याकडून ५ लाख २५ हजार, अशा रकमा घेत आणि शेतकºयांचा विश्वास संपादन करून ३३ लाख ७५ हजार रुपये घेतले. पण कराराप्रमाणे कोणत्याही अटींचे पालन केले नाही.
शेतकºयांचे पैसे परत देण्याचे वेळोवेळी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अजित गंगाराम वझे यांनी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन कंपनी व संचालक, भागीदारांविरोधात तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.