शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या ब्लिंकिंट गोदामात मुदतबाह्य पेय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:37 IST

...मात्र एका मुलीस उलटी सारखे वाटू लागल्याने त्या शीतपेयांच्या टेट्रापॅक वरील मुदत तपासली असता ते सर्व मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. 

मीरारोड- मीरारोडच्या ब्लिंकिटच्या नावाने चालणाऱ्या गोदामात मुदतबाह्य पेय व खाद्य सापडल्याची तक्रार मनसेने केली असून घटनास्थळी पोलिसांनी येऊन खात्री केल्या नंतर अन्न निरीक्षक यांनी पडताळणी केली आहे. 

मीरारोड भागातील मनसेचे पदाधिकारी नितीन लोटणकर यांनी त्यांचा मुलीचा वाढदिवस असल्याने लहान मुलांसाठी ब्लिंकिंट वरून टेट्रापॅक मधील २० शीतपेय मागवली होती. वाढदिवसाची शीतपेय मुलांना वाटली व मुलांनी ती पिऊन संपवली. मात्र एका मुलीस उलटी सारखे वाटू लागल्याने त्या शीतपेयांच्या टेट्रापॅक वरील मुदत तपासली असता ते सर्व मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. 

मनसेचे उलजिल्हाअध्यक्ष हेमंत सावंत, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन पोपळे, शशी मेंडन सह मनसैनिकांनी नया नगर पोलिसांना तक्रार केली तसेच शिवार उद्यान समोरील ओस्तवाल पॅरेडाइज मधील ब्लिंकिटच्या गोदामा सर्व गेले. गोदामातील काही पेय व खाद्य तपासणी केली असता त्यात टॉनिक वॉटर आणि मियॉनीज पॅकेट पण मुदतबाह्य आढळून आले. आलेल्या पोलिसाने गोदाम बंद करण्यास सांगितले. तर सोमवारी अन्न निरीक्षक दिपाली वंजारी यांनी गोदामात जाऊन पडताळणी केली. सदर प्रकरणात एका  निवृत पोलिस अधिकारीचे नाव सांगून कारवाई होऊ नये म्हणून दबाव आणला जात असल्याचे एका मनसे पदाधिकारी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Road Blinkit warehouse found with expired drinks, MNS complains.

Web Summary : MNS complained after expired drinks and food were discovered at Blinkit's Mira Road warehouse. Police and food inspectors investigated after a child fell ill from consuming expired beverages purchased from Blinkit for a birthday.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड