ईव्हीएम मशीनसह एसटी घाटात लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 23:45 IST2019-05-01T23:44:49+5:302019-05-01T23:45:51+5:30
एसटीच्या चालकाने दारू पिऊन बस घाटात रस्त्याच्या कडेला लावून ठेवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.

ईव्हीएम मशीनसह एसटी घाटात लावली
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतदान संपल्यावर मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील ईव्हीएम मशीन घेऊन परतणाऱ्या एसटीच्या चालकाने दारू पिऊन बस घाटात रस्त्याच्या कडेला लावून ठेवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
२९ एप्रिल रोजी झालेल्या मतदाना दरम्यान मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील सेक्टर झोन. क्र .१० साठी ईव्हीएम मशीन व निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन गेलेली बस पुन्हा रात्री ९:१५ वाजता जव्हार निवडणूक कार्यलय येथे परत येत असताना एसटी बसचा चालक योगेश गोवारी (३८) वर्ष हा दारू पिऊन एसटी चालवत होता. या बसच्या सोबत पोलीस संरक्षण असलेले वाहन देखील बरोबर असतानाही चालकाला दारूची नशा अधिक झाल्याने त्याने खोडाळ्या पासून घाटात पाचशे मीटर अंतरावर एसटी रस्त्याच्या कडेला लावून ठेवल्याची घटना घडली होती. एसटीच्या चालकाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश गोवारी याला अटक करण्यात आली आहे.