वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजरच्या गाडीचे इंजिन डब्ब्यापासून झाले वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:36 IST2023-09-30T18:33:35+5:302023-09-30T18:36:31+5:30
दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला होता प्रकार

वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजरच्या गाडीचे इंजिन डब्ब्यापासून झाले वेगळे
पालघर/सफाळे: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजर च्या गाडीचे इंजिन डब्ब्यापासून वेगळे झाल्याने पश्चिम रेल्वेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विरारहून वैतरणा स्थानकात दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी पॅसेंजर गाडी आली होती. वैतरणा स्थानकातून ही पॅसेंजर गाडी पालघर च्या दिशेने निघाली असताना वेळेस अचानक इंजिन ला जोडलेल्या डब्याचे कपलिंग तुटून इंजिन काही मीटर लांब गेले.ह्याबाबत प्रवाशांनी आरडाओरड केल्या नंतर पॅसेंजर च्या चालकाच्या ही बाब लक्षात आल्यावर इंजिन थांबविण्यात आले.ह्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून हे इंजिन जर आणखी पुढे गेले असते तर वैतरणा नदीवरील रेल्वे पुलावरून हे डबे जर खाली कोसळले असते तर मोठी प्राणहानी झाली असते अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रवाष्यानी दिली.