शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्रेमप्रकरणातून केला विष पाजण्याचा प्रयत्न, प्रियकराला धडा शिकवण्यासाठी सूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:11 IST

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकरणातून एका महिलेने प्रियकराच्या पाच वर्षाच्या मुलीचे विरारमधून अपहरण करून मुंबईत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर असल्याने चिमुरडी बचावली असून पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.

वसई - लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकरणातून एका महिलेने प्रियकराच्या पाच वर्षाच्या मुलीचे विरारमधून अपहरण करून मुंबईत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर असल्याने चिमुरडी बचावली असून पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.गेल्या शनिवारी नालासोपाºयातील अनिता वाघेला (२२) या तरुणीने रिक्शाचालक संतोष सरोज याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून संतोष लग्नाला नकार देत असल्याने त्याची मुलगी अंजली सरोज (५) हिचे नालासोपाºयातून अपहरण करून गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनमधील महिला स्वच्छतागृहात नेऊन तिला ठार मारले होते. त्यामुळे वसईत खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार विरारमध्ये उजेडात आला आहे. चांदीप येथे राहणाºया ज्योती कांबळे (२४) हिचे त्याच गावात राहणाºया एका विवाहित इसमाशी प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरणातून दोनवेळा गर्भपातही झाला होता. मात्र, तो लग्नाला नकार देत असल्याने ज्योती संतापली होती. त्यामुळे तिने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. प्रियकराची पाच वर्षांची मुलगी विरारमधील एका शाळेत शिकत होती. शनिवारी ज्योतीने शाळेत जाऊन तिला आपल्यासोबत घेऊ़न लोकल पकडून दादरमधील एका उद्यानात गेली. त्या ठिकाणी ज्यूसमधून तिने चिमुरडीला विष पाजले. आणि स्वत:च्या हाताने तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले. चिमुरडीला ग्लानी आल्यानंतर ती तिला घेऊन टॅक्सी पकडून महालक्ष्मी मंदिराजवळ आली. तेथेच तिला फूटपाथवर टाकून ती घरी परत आली. गावदेवी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला चिमुरडी रस्त्यावर निपचित पडलेली दिसली. त्यांनी लोकांच्या मदतीने तिला ब्रिच कँडी हॉस्पीटलमध्ये नेले. तसेच तिच्या गणवेशावरून शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने ते हॉस्पीटलमध्ये पोचले. इकडे पोलिसांनी शाळेपासून ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज काढले. त्यात एक महिला तिला घेऊन जात असल्याचे दिसले. पालकांनी ती ज्योती असल्याचे ओळखल्यानंतर तिला अटक केली.लहानगीवर अत्याचाराचा विकृ त प्रकारज्योतीचे मुलीच्या वडिलांवर प्रेम होते. पण, तो शारिरिक संबंध ठेऊनही लग्नाला नकार देत होता. आपली फसवणुक झाल्याची भावना झाल्याने ती संतापली होती. त्यातूनच तिने सूड उगवण्याचे निर्णय घेतला. प्रियकराच्या पाच वर्षांच्या मुलीला कायमची संपवून तिने धडा शिकवण्यासाठी तिचे अपहरण करून तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर मुलीवर स्वत:च्या हाताने लैंगिक अत्याचार केल्याची कबुली तिने दिली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या