An earthquake of magnitude 4.8 on the Richter scale hit Palghar | पालघर, डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पालघर, डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पालघर -  जिल्ह्यातील डहाणू, तलासरी येथे शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 5.22 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. सुदैवाने यातत कोणतेही नुकसान झालेले नाही. 

याबाबत मुख्य अधिकारी विवेकानंद कदम म्हणाले की, जिल्ह्यात पहाटे पाचच्या सुमारास ४.८ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तर यापूर्वी जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, कमी तीव्रतेमुळे अद्याप कोणतेही नुकसान झालेले नाही. शुक्रवारी संध्याकाळी उत्तराखंडमधील चमोली आणि रुद्रप्रयाग येथे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 5.57 वाजता चमोली येथे हा भूकंपाचा धक्का जाणवला, उकिमठ ते रुद्रप्रयाग पर्यंत पाचच्या सुमारास. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्रबिंब चामोलीजवळच राहिले. रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तापमान 4.4 झाले. रुद्रप्रयाग येथे त्याचे प्रमाण ... इतके होते. भूकंपाचा धक्का बसताच लोक घराबाहेर गेले.
 

Web Title: An earthquake of magnitude 4.8 on the Richter scale hit Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.