शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

नालासोपाऱ्यात झेरॉक्सच्या दुकानात ई-पास काळाबाजार; गरजू नागरिकांची खुलेआम लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:42 AM

१५०० रुपये मोजल्यानंतर मिळतो पास

नालासोपारा : वसई-विरार शहराबाहेर जाण्यासाठी नागरिकांना ई-पास घेणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या ई-पासचा खुलेआम काळाबाजार करून नागरिकांची लूट चालवली आहे. पाससाठी आॅनलाइन अर्ज केल्यास सतत प्रतीक्षा करा, असा मेसेज झळकतो.त्यामुळे अनेक दिवस उलटूनही हे पास नागरिकांच्या हाती पडत नाहीत. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध न होणारे ई-पास नालासोपारा येथील झेरॉक्सच्या दुकानातून मात्र १५०० रुपये मोजून मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आपल्या गावी जाता यावे यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी मुख्यालयात ई-पास आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीला जाण्यासाठी आॅनलाइन पास काढण्याचा प्रयत्न शेकडो नागरिकांनी केला. मात्र त्यांना अ‍ॅप्रूव्हल मिळाले नाही. यू आर वेटिंगचा मेसेज त्यांना येत होता. बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा येथील कार्यकर्ते महेंद्र कदम यांनाही ई-पाससाठी पंधराशे रुपये मोजावे लागले आहेत.

कदम यांच्या आजारी वडिलांना तातडीने गावी जायचे होते. त्यासाठी त्यांनी ई-पास काढण्याचा आॅनलाइन प्रयत्न वारंवार केला. मात्र, त्यांच्या पासला अ‍ॅप्रूव्हल न येता वेटिंग असा मेसेज येत राहिला. वडिलांचे गावी जाणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे कदम यांनी एका मित्राची मदत घेतली. त्याने झेरॉक्सच्या दुकानात जा. लगेच काम होईल, असा सल्ला दिला. त्यामुळे कदम यांनी जवळील झेरॉक्सच्या दुकानात धाव घेतली असताई-पाससाठी त्यांच्याकडून पंधराशे रुपये उकळले.

जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना फोन करून माहिती दिली असून, प्रत्यक्ष जाऊन माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगणार आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार.- प्रवीण म्हाप्रळकर, तालुकाप्रमुख, शिवसेना

माहिती घेऊन चौकशी करतो. ई-पासेस आॅनलाइन मिळत असून जिल्हाधिकारी कार्यालयातूनच दिले जातात. नेमके हे ई-पास कोण बनवून देत होते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.- किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

पोलिसांना याबाबत माहिती देऊन चौकशी करायला सांगतो. हे झेरॉक्स दुकानवाले कसे पैसे व कोणासाठी घेतात याचीही चौकशी करून तथ्य आढळले तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल.- डॉ. कैलाश शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या