शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:39 AM

प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे.

नालासोपारा : प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे. लोकलमधुन उतरणाऱ्या प्रवाशांचे पाय आता रेल्वे स्टॉल कडे तर बस, खाजगी वाहनातील प्रवासी थंड पेयाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांनी ही खादयपदार्थ पेक्षा थंड पेय विक्र ी वर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.सामान्य प्रवाशांची लिंबूपाणी व कोकम सरबतला पसंती असल्यामुळे सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहे. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक रेल्वेच्या उपनगरीय गाडीने प्रवास करतात विशेषत: सकाळी वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातून लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, दिवा, डहाणू साठी प्रवास करतात दीड ते दोन तासांच्या प्रवासात उकाड्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण होत आहेत.लोकलमधुन उतरल्यानंतर पहिल्यांदा स्टेशनवरील स्टॉल गाठतात तर बस व अन्य वाहनातील प्रवासी थंड पेयाची गाडी शोधत चार ते पाच रु पयात मिळणाºया लिंबू पाणी, कोकम सरबतला पसंती देत आहेत. अनेक जण एका स्टॉलवर दररोज सुमारे २० ते ३० लीटर लिंबु पाण्याची विक्र ी होत असल्याचे विरार, नालासोपारा येथील स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. मिनरल पाणी, कोल्ड्रिक व अन्य पेयाची मागणी नेहमीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्था पेक्षा थंडपेयांना जास्त मागणी असते. काही महत्वाच्या रेल्वे स्टॉलवर मोसंबी, गाजर, अननस आदी फळांचे ज्यूस स्टॉलवरही प्रवासांची गर्दी दिसून येते. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येते. उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ बांधून प्रवास करीत आहेत.कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्य पदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च मिहन्याच्या अखेरीला तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाºया चाकरमान्यांनी ग्लुकोज पाणालाही पसंती दिली आहे.>उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबूपाणी जास्त सेवन करावे, यात सी जीवनसत्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांस जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीज मधील पाणी घातक असून यामुळे घशाचे विकार होवू शकतात. बाहेरील अशुध्द पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार डोके वर काढू शकतात.- डॉ. सचिन पाटील