मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 14:55 IST2023-10-28T14:52:18+5:302023-10-28T14:55:19+5:30
मात्र आरपीएफ ने अधिक चौकशी केली असता सदर साधू वड राई च्या अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात आल्याचे समोर आले आहे.

मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले
हितेन नाईक
पालघर- मुंबई जयपूर एक्सप्रेस ट्रेन मध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट रेल्वेच्या हेल्पलाइन वर आल्या नंतर पालघर रेल्वे स्थानकाच्या तीन नंबर क्रमांक चार साधू ना आरपीएफ ने ताब्यात घेतले. मात्र आरपीएफ ने अधिक चौकशी केली असता सदर साधू वड राई च्या अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात आल्याचे समोर आले आहे.
पश्चिम रेल्वे च्या जयपूर वरून बांद्रा कडे जाणाऱ्या जयपूर बांद्रा एक्सप्रेस ट्रेन मध्ये साधू वेषात ''चार आतंकवादी दिखाई दे रहे है ' अश्या आशयाचा ट्विट रेल्वे हेल्पलाइन वर ट्रेन मधील एका प्रवाशाने पाठविला होता. ह्या ट्विट मुळे एकच खळबळ उडाली नंतर पालघर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वर ही ट्रेन....वाजता येणार असल्याने आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी तत्काळ ट्रेन च्या तपासणी साठी मोठा बंदोबस्त लावला होता.ही ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आल्या नंतर एक्सप्रेस च्या इंजिन ला लावण्यात आलेल्या १९७०६१/c ह्या डब्यात बसलेल्या साधू ना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अधिक चौकशी केली असता हे साधू पालघर तालुक्यातील वड राई येथील अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी आले होते.आरपीएफ पोलिसांनी ह्या चारही साधूंचे जबाब लिहून घेत नंतर त्यांना सोडून दिले.