शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

बोर्डीत एका पोलिसाच्या पत्नीची हुंडाबळी विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 5:56 PM

बोर्डीतील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या ई विंगमधील 207 रूममध्ये पोलीस नाईक सुनील खरात याच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय पत्नी शामल हिने बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पालघर- बोर्डीतील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या ई विंगमधील 207 रूममध्ये पोलीस नाईक सुनील खरात याच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय पत्नी शामल हिने बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या वेळी आरोपी बाजूच्याच खोलीत झोपला होता, या दाम्पत्याचा तीन वर्षीय मुलगा साहिल शाळेतून घरी आल्यावर त्याने डोअरबेल वाजवल्यावर आरोपी दरवाजा उघडण्यासाठी गेल्यानंतर सदर प्रकार लक्षात आल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्यानंतर शेजा-यांना बोलावून घटना प्रकार सांगितला, शिवाय मृतदेहजवळ 14 महिन्यांचा छोटा मुलगा पिऊंशी याला उचलून त्यांच्याकडे सोपवले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात फोन करून कळविले. सोसायटी सदस्यांनी घोलवड पोलिसांना खबर दिल्यावर त्यांनी घटनस्थळाहून मृतदेह आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्याच्यावर भादंवि कलम 304 ब आणि 306 नुसार गुन्हा नोंदवून अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. या खोलीतून मशिनगन आणि दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.दरम्यान हा हुंडाबळी असल्याचा आरोप मयताच्या आईवडिलांनी करून चौकशीची मागणी केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह गुरुवारी सकाळी माहेरी नाशिक येथे नेण्यात आला. तर दोन्ही मुलं खरात कुटुंबीयांकडे आहेत. नलिनी पाटील यांच्या मालकीचा हा रूम असून हे दाम्पत्य मागील तीन वर्षांपासून येथे राहत होते. त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. हुंड्याप्रमाणेच आरोपीच्या विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.