भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:49 AM2019-11-29T00:49:35+5:302019-11-29T00:50:18+5:30

खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत

Domesticated bulls now face drought | भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

Next

- अनिरु द्ध पाटील

डहाणू/बोर्डी : खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत. मात्र अवकळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बैलमालकाला निम्मीच रक्कम देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

या वर्षी पाऊस लांबल्याने डहाणू तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ६०६.८ हेक्टर भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे २० हजार ३१९ शेतकरी बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र अज्ञानामुळे कागदपत्र सादर न केलेले तसेच शासकीय नोकरदार आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि शेत जमिनीचा ७/१२ नावावर नसलेले अशा प्रकारात मोडणाºया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील डोंगरपट्ट्यात राहणाºया शेतक-यांचा शेती कसण्याच्या प्रकारानुसार वेगळा गट या तालुक्यात असून तो किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावामधून खरीप हंगामातील भात लागवडीच्या कामाकरिता चार महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर बैल घेऊन उखळणी, चिखलणी, धान्य आणि पावळीच्या वाहतुकीच्या कामाकरिता वापर केला जातो. मे अखेर ते जून मध्य या काळात मालकांकडून भाडेतत्त्वावर बैल घेऊन जाण्यास प्रारंभ होतो. हा व्यवहार करताना रोख पैसे, धान्य किंवा पावळी यापैकी कोणत्याही एका प्रकारातील हा व्यवहर केला जातो.

किना-यालगत गावांमध्ये गुरे चरणाचा अभाव असल्याने पावसाळ्यात जनावरांच्या चा-याचा निर्माण होणारा प्रश्न या व्यवहारामुळे काही अंशी सुटतो. शिवाय नवीन बैलांना नांगरणी, चिखलणी तसेच बैलगाडी ओढण्याकरिता तयार करणे हे जिकरीचे काम असते. त्यामुळे शेतक-यांना तेथे पाठविल्याने अनौपचारिकरित्या ट्रेनिंग स्कूलमधून विनामूल्य प्रशिक्षित बैल मिळतो. अशा पद्धतीने बैलमालकाला या व्यवहारातून अनेक फायदे होतात. तर डोंगरी भागात चढ-उताराची शेती असल्याने पॉवर टिलर चालविणे तितकेसे सोपे नसते. पावसाळ्याव्यतिरिक्त या भागात चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनत असल्याने भाडोत्री बैलांचा व्यवहार येथील शेतकºयांसाठीही लाभदायक ठरतो.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे खरिपातील भात पिकाच्या हंगामाला नुकसानीचे ग्रहण लागल्याने भात, पावळी अशा सर्वच प्रकारचे उत्पन्न घटले. यावर्षी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बैलाची किंमत २ हजार रुपये एवढी होती. मात्र दुष्काळामुळे तेवढे भाडे देणे परवडणारे नसल्याने निम्मे म्हणजे १ हजार रुपये बैलमालकाला देण्याची नामुष्की ओढवली आहे. बैलांना माघारी आणून ते मालकाला सोपवताना त्यांची घालमेल झाली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने आम्हाला समजून घेतले. मात्र नावावर ७/१२ नसल्याने शासनाने समजून न घेतल्याची प्रतिक्रि या भाडेतत्त्वावर बैल घेतलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली.


 

Web Title: Domesticated bulls now face drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.