डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू? हॉस्पिटलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:09 IST2018-10-31T23:08:43+5:302018-10-31T23:09:06+5:30

नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रितू सिंग यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करून रुग्णालयाची तोडफोड केली.

Doctor's death death? The disruption of the hospital | डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू? हॉस्पिटलची तोडफोड

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू? हॉस्पिटलची तोडफोड

नालासोपारा : नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रितू सिंग यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करून रुग्णालयाची तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले.

त्यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर सूर्यदीप रु ग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर अनिल कुमार यादव यांनी त्यांना अन्य खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्यांच्या नातेवार्इंकांनी रुग्णालयाची तोडफोड करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. ही माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डॉक्टरांना पोलीस ठाण्यात नेले. माझ्या बहिणाला काय झाले? तिच्यावर कुठले उपचार सुरू आहेत? याची डॉक्टर यादव यांनी काहीच माहिती दिली नाही, असा आरोप त्यांची बहिण सुमित्रा सिंग यांनी केला आहे. आम्ही डॉक्टर अनिलकुमार यादव याच जबाब घेतला असून तपास सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Doctor's death death? The disruption of the hospital