शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:29 AM

डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वेसमस्या कायम

- पंकज राऊतबोईसर : डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या लाखो प्रवाशांची उपनगरीय (लोकल ) सेवा ही जीवनदायी असून या मार्गावरील अनेक समस्या लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या व गेल्या तरी अजूनही कायम असून त्या लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने वेळच्या वेळी सोडविल्या न गेल्याने त्याचा प्रचंड मानसिक त्रास आज चाकरमनी, महिला व वयोवृद्ध, अपंग तसेच कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला बुलेट ट्रेनची नव्हे तर वैतरणा ते डहाणू, विरार दरम्यानच्या लोकलसेवेच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी - माजी खासदार (जे निवडणूक रिंगणात आहेत) त्याच बरोबर इतर ही उमेदवार आम्ही व आमच्या पक्षाने, संघटनेने डहाणू - विरार दरम्याच्या रेल्वे प्रवाशांचे काही सोडविलेल्या प्रश्नांबरोबरच आम्ही हि कामे केली ती कामे केली असे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेऊन मागील प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही लवकरच सोडवू अशी (प्रत्येक निवडणुकीत देणारी) आश्वासन या वेळीही नेहमीप्रमाणे पुन्हा देतील.

मागील अनेक निवडणुकीत मतदारांनी सर्वच पक्षांना संधी देऊनही रेल्वेचे प्रश्न का सुटले नाहीत. पूर्वी हा मतदार संघ डहाणू व उत्तर मुंबई या दोन मतदार संघात विभागला होता लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता डहाणू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा पाच वेळा तर एक वेळा शंकर नम निवडून आले होते, दोन वेळा भाजपा -सेना युतीचे चिंतामण वनगा, तर एक वेळा माकपचे लहानु कोम यांना मतदारांनी संधी दिली होती तर उत्तर मुंबईतून पाच वेळा भाजपाचे राम नाईक एक वेळा काँग्रेसचे (परंतु बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनी पाठिंबा दिलेले) उमेदवार अभिनेते गोविंदा निवडून आले होते. २००९ साली लोकसभेचा पालघर हा (अनुसूचित जमाती करीता राखीव) मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला, पुनर्रचनेनंतर प्रथम बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा व पोटनिवडणुकीत भाजपचेच राजेंद्र गावित निवडून आले होते. म्हणजेच आताच्या निवडणुकीतील जवळ जवळ सर्वच पक्षांना येथील भोळ्याभाबड्या मतदारांनी कधी सलग तर कधी आलटून पालटून संधी दिली होती. तरीही त्यातला एकही जण रेल्वेच्या या समस्या सोडवू शकलेला नाही.

प्रवाशांच्या नशिबी अठरा वर्षे ‘वनवास’ कुणामुळे आला? तो संपणार तरी कधी? मग आज प्रत्येक जण विकासाच्या व रेल्वे प्रश्नांबाबत बोलतात मग अजूनही प्रश्न, समस्या व अडचणी का सुटल्या गेल्या नाहीत याचे उत्तर प्रचारा दरम्यान मत मागणारे उमेदवार ,त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मतदारांना देतील का ?असा प्रश्न त्रस्त रेल्वे प्रवासी विचारत आहेत.डहाणू रोडपर्यंत उपनगरी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी प्रत्यक्षात लोकल सेवा सुरु झाली एवढ्या प्रतिर्घ कालावधी लोकल सेवा सुरु करण्या करिता लागला याला रेल्वे प्रशासनाने अनेक अडचणीचे घोडे दामटवून वेळ काढूपणा केला आहे. खंबिर नेतृत्वा अभावीच हे घडले आहे.डहाणू पासून वैतरणा पर्यंतच्या रेल्वे स्थानकावरून प्रतिदिन सुमारे (सरासरी) एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात परंतु प्रवाशांना अनेक प्रश्न, समस्या, अडचणी व गैरसोयींना तोंड देऊन प्रचंड मानिसक त्रास सहन करून व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन