शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

विरोधकांच्या दबावाला घाबरणार नाही- आ.ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:25 PM

वाघाचे मांजर झाल्याची उपरोधिक टीका

डहाणू : विरोधकांच्या दबावाला घाबरणार नाही, युती सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून जनतेवर अन्याय केला आहे.राजकीय तत्वांना हरताळ फासणाऱ्या युतीच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाआघाडी तयार असल्याचे परखड मत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी डहाणू दशश्री हॉल येथे शनिवारी झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसून आता सेनेचा वाघ म्हणजेच उद्धव मांजर झाला असल्याची उपरोधिक टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. युतीच्या विरुद्ध महायुतीचा निश्चित विजय होणार असून कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागावे असे अवाहन आमदार आनंद ठाकूर यांनी केले. तसेच प्रत्येक निवडणुकीचे वेळी राम मंदिराच्या मुद्दा उपस्थित करून नरेंद्र मोदी आणि योगी हे लोकांना मूर्ख बनवित असतात त्यांच्या खोटारडेपणाची हद्द झाली असून आता जनता फैसला करणार आहे असे ते म्हणाले. मसोली येथील दशाश्री समाज वणीक सभागृहात महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचार सभेत ठाकूर यांनी युतीच्या जनताविरोधी धोरणांवर कडक टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू विधानसभा अध्यक्ष राजेश पारेख उपस्थित होते.शिंदेवर निशाणास्व.आनंद दिघे यांच्याप्रमाणे दाढी ठेवण्याचा सुरु वातीला मी प्रयत्न केला. पण नाही जमले. मात्र आता शिवसेनेचे काही नेते दाढी वाढवून स्वत: आनंद दिघे यांच्याप्रमाणेच केविलवाणा आव आणतात. परंतु दिघे यांच्या कार्याची सर त्यांना कधीच येणार नाही, असे सांगून ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदेवर निशाणा साधला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरHitendra Thakurहितेंद्र ठाकूर