जिल्हापरिषदेची कामण शाळा झाली डिजिटल
By Admin | Updated: March 4, 2016 01:26 IST2016-03-04T01:26:22+5:302016-03-04T01:26:22+5:30
वसई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली कामण जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली असून त्यासाठी विजय पाटील यांनी अर्थसहाय केले. आदिवासीबहुल असलेल्या या केंद्रातील कामण ही तिसरी शाळा ठरली.

जिल्हापरिषदेची कामण शाळा झाली डिजिटल
पारोळ : वसई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली कामण जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली असून त्यासाठी विजय पाटील यांनी अर्थसहाय केले. आदिवासीबहुल असलेल्या या केंद्रातील कामण ही तिसरी शाळा ठरली. या शाळेतील संगणकीकरणामुळे ग्रामीण भागातील मुलांना तंत्रज्ञानाची माहिती होऊन भविष्यात ही बाब त्यांना फायद्याची ठरणार आहे.
या शाळेच्या उद्घाटनासाठी आ. विवेक पंडीत, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा खेतले, जि. प. सदस्या चित्रा किणी, नगरसेविका प्रिती किणी, गटविकास अधिकिारी कांबळे, माजी जि. प. सदस्य विजय पाटील व सुनिता पाटील हे मान्यवर उपस्थित होते. जिल्हापरिषद शाळांमध्ये मुलांची संख्या कमी होत चालली असून इंग्रजी माध्यम, सी. बी. एस. सी. बोर्ड, इंटरनॅशनल स्कूल या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याचा कल पालकवर्गात निर्माण होत आहे. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च ही उचलावा लागत आहे. त्यामुळे जिल्हापरिषद शाळांमध्यही आधुनिक पद्धतीचे शिक्षण दिले तर ते जिल्हापरिषद शाळांची पटसंख्या वाढविणारे ठरेल. या हेतूने प्रत्येक शाळेतील डिजीटलकरणासाठठी अडीचलाख रू. खर्च करून तीन शाळा आम्ही डिजीटल केल्या असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.