शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:11 IST

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव

पालघर : रिलायन्स गॅस पाईप लाईन आणि कर्म ब्रह्मांड गृहप्रकल्पाच्या व्यवस्थापकांकडून सर्वसामान्य जनतेची झालेली आर्थिक फसवणूक तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे या विषयावर मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाºयाची भेट घेऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली.

जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव डॉ. नारनवरे यांना शिष्टमंडळाने करून दिली. जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट दर शेतक-यांना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असतांना देखील ते पायदळी तुडवून शेतक-यांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे असा आरोप करून शेतकºयांनी विरोध केला तर पोलीस बळाचा वापर करु न, ही पाईपलाईन टाकण्याचं काम हुकूमशाही पद्धतीने सुरुच असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. या विषयावर ताबडतोब निर्णय घेऊन, बाधित संबंधित शेतकर्यांना न्याय द्यावा अशी ताठर भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने, येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असे नारनवरे यांनी आश्वस्त केले.केळवे रोड येथील बहुचर्चित कर्म ब्रह्मांड विकासकांकडून ग्राहकांना भुलविणाºया जाहिराती देऊन भुरळ पाडली आणि त्याच ग्राहकांकडून गृहप्रकल्प उभारण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम व प्रत्येक महिन्याला उरलेल्या किमतीचा सम हप्ता घेऊन करोडो रु पयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. कष्टाने जोडलेले पैसे यात गुंतवल्यानंतर आज दोन वर्षांनंतर देखील प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकाम झालेलं नाही. पैसेही नाहीत व घरेही नाहीत अशी गुंतवणूकदारांची स्थिती झाल्याने चिंता व्यक्त करून मनसे शिष्टमंडळाने विकासकांवर आर्थिक अपहार प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली. करून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे गरजेचे असतांना देखील त्या बाबत प्रशासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचे स्पष्ट मत मनसे शिष्टमंडळाने व्यक्त केले. पालघर जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने वसई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अपुरे पडत असल्याचे संखे यांनी नारनवरे यांच्या निदर्शनास आणून दिले.सदर चर्चेत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुकाध्यक्ष मंगेश घरत,तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राउत, मनविसे लोकसभाध्यक्ष धीरज गावड, महिला शहराध्यक्ष गीता संखे, मनसे पदाधिकारी शैलेश हरमळकर, सागर शिंदे, रूपेश पाटिल, उदय माने,निलिम स्ंखे,वैभव घरत,निलेश पाटील,तन्मय संखे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRelianceरिलायन्सMNSमनसे