सवरा यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना ‘जिओ’ टॉवरवर कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:42 IST2018-10-23T23:42:05+5:302018-10-23T23:42:07+5:30
मनोर पालघर रस्त्यावर गोवाडे येथे घराच्या बाजूला जिओ रिलायन्स कंपनीच्या टॉवर बांधकामावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

सवरा यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना ‘जिओ’ टॉवरवर कारवाईचे आदेश
मनोर : मनोर पालघर रस्त्यावर गोवाडे येथे घराच्या बाजूला जिओ रिलायन्स कंपनीच्या टॉवर बांधकामावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.
गोवाडे येथील रहिवासी राकेश बाळाराम पाटील यांच्या घरापासून १० मीटर अंतरावर असलेल्या अशोक पाटील यांच्या मालकी जागेत ग्रामपंच्यातीच्या परवानगीने मोबाइल टॉवरचे काम सुरू केले आहे. त्या टॉवर मधून निघणाºया रेडिएशनपासून परिसरात रोगराई पसरू शकते. म्हणून राकेश यांनी गटविकास अधिकारी, तहसिलदार आदी कार्यालयात पत्र देऊन बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला होता कोणीही दखल घेतली नाही अखेर आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी त्यांच्या अर्जाची दखल घेऊन पालघर जिल्हाधिकाºयांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
मोबाईल टॉवरचे बांधकाम व ते उभारण्यासाठी ग्रामपंचायत गोवाडेना हरकत दाखला दिला आहे राकेश यांनी विरोध केला असला तरी सर्व सदस्यांनी मासिक मीटिंग घेऊन सर्वांच्या अनुमतीने परवानगी दिली आहे व त्या पासून लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल ती जबाबदारी जिओ रिलायन्स कंपनीची राहील असे ग्रामसेवक सतीश भागवत यांनी लोकमतला सांगितले.