हिरे व्यापाऱ्यास बिल्डरने घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:51 IST2019-07-29T23:50:12+5:302019-07-29T23:51:35+5:30
वालीव पोलिसात गुन्हा : रिलायबल प्रकल्पात झाली फसवणूक

हिरे व्यापाऱ्यास बिल्डरने घातला गंडा
वसई : वसई पूर्व राजावली येथील एका गृहनिर्माण प्रकल्पात बिल्डरने गुंतवणूकदार हिरे व्यापाºयाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका बड्या हिरे व्यापाºयाने वसईतील
नायगाव पूर्व येथील रिलायबल गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पात तब्बल चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या मोबदल्यात रिलायबल गार्डनच्या बिल्डर्सने त्या व्यापाºयास दर तिमाही १५ लाख रुपये लाभांश देण्याचे नक्की केले होते. त्या अनुषंगाने बिल्डरने मार्च ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत हिरे व्यापाºयास १ कोटी २५ लाख परत केले. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बिल्डरने हिरे व्यापाºयास २ कोटी ७५ लाख आणि त्यावरील लाभांश मोबदला म्हणून परत दिला नाही. त्या उर्वरित रकमेची हमी म्हणून बिल्डरने आपल्या प्रकल्पातील ५३ फ्लॅट हिरे व्यापाºयास दिले. मात्र, मधल्या काळात बिल्डरने दिलेल्या त्या प्रकल्पातील ५३ फ्लॅटपैकी १५ फ्लॅटची परस्पर विक्री केली.