अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणूतील समुद्रात सॅटेलाइट टॅग लावून २० नोव्हेंबरला सोडलेले ‘धवल लक्ष्मी’ ही ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासव मादी शंभर दिवसांत ओमान किनाऱ्यापर्यंत पोहचली. तिने ९ मार्चला भ्रमंतीचा हा टप्पा पूर्ण केला. डहाणूहून गुजरात, दमणच्या समुद्रातून ओमान देशात ती पोहचली. सागरी प्रवाह आणि अन्न स्रोतांचा मागोवा घेत ते फिरत असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात जखमी अवस्थेत आलेल्या या ऑलिव्ह रिडले मादी कासवावर ३ महिने उपचार केले. त्याचे धवललक्ष्मी नामकरण करून त्याच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग लावून २० नोव्हेंबर २०२५ रोजी डहाणूच्या समुद्रात सोडली होती. त्याच्या सागरी जलविहाराची माहिती वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कांदळवन विभागाकडून घेतली जात आहे.
केवळ पाच दिवसांत ४५ किमीचा प्रवास
२० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात धवललक्ष्मीने सोडलेल्या ठिकाणापासून ४५ किमीचे अंतर कापले होते. तर डिसेंबर महिन्यात दमण आणि गुजरातच्या सोमनाथ समुद्रात आणि ५ जानेवारीला पोरबंदर किनाऱ्यापासून ४०० किमी खोल समुद्रात होती.
२० जानेवारी रोजी किनाऱ्यापासून ७०० किमीवर होती. ५ फेब्रुवारीला त्यापासून ५०० किमीवर असताना २५० मीटरपर्यंत डुबक्या मारताना आढळली.
...ते ठरले देशातील पहिले कासव
उपचारानंतर सॅटेलाइट टॅग लावलेले देशातील हे पहिले कासव. २६ फेब्रुवारी रोजी हे कासव ओमान देशाच्या समुद्रात प्रसिद्ध मसिराह बेटापासून १६० किमी पूर्वेस होते. हे उत्तर हिंदी महासागरातील बेट लाँगरहेड प्रजातींच्या कासवांच्या घरट्यांसाठी ओळखले जाते.
अन्न शोधण्यासाठी डुबकी...
९ मार्च रोजी शंभर दिवसानंतर धवललक्ष्मी ओमान देशाच्या समुद्रकिनाऱ्यापासून खोल समुद्रात २०० किमी अंतरावर पोहचली. त्यानंतर ईशान्येकडे जाण्यासाठी मार्ग बदलला असून तेथील प्रचलित सागरी प्रवाह तसेच अन्न शोधण्यासाठी पाण्यात डुबकी मारत असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. तिच्या हालचालींवरून हे ठिकाण त्याला ओळखीचे असल्याचा कयास लावला जात आहे. तिच्या या प्रवासावर आता अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
Web Summary : A rescued Olive Ridley turtle, named Dhawalaxmi, traveled from Dahanu, India, to Oman in 100 days. Fitted with a satellite tag, her journey through the Arabian Sea is being tracked by researchers, revealing valuable insights into sea turtle migration and feeding patterns.
Web Summary : बचाई गई ओलिव रिडले कछुआ, 'धवललक्ष्मी', 100 दिनों में दहानू, भारत से ओमान पहुंची। सैटेलाइट टैग लगने के बाद, अरब सागर के माध्यम से उसकी यात्रा को शोधकर्ताओं द्वारा ट्रैक किया जा रहा है, जो समुद्री कछुए के प्रवास और भोजन के पैटर्न में बहुमूल्य अंतर्दृष्टि प्रकट करता है।