शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी, बळीराम जाधव यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:59 IST

पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदार संघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. काही विधानसभा मतदार संघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्र म नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करून बविआचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांनी नवीन मतदारांची नोंद कोणत्या विधानसभा क्षेत्रात झाली, त्यांनी कुठे मतदान केले याची माहिती मागितली असून जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मेच्या मतमोजणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.सोमवारी माजी खासदार बळीराम जाधव, बविआचे ज्येष्ठ नेते प्रवीण राऊत, जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांची भेट घेतली. नवीन मतदारांची नोंदणी करताना त्यांनी बीएलओ मार्फत तपासणी व पडताळणी होणे आवश्यक असते. काही विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवसाला ३०० पेक्षा अधिक मतदारांची सरासरी दररोज नोंदणी केली गेली असून याबद्दल मला शंका वाटते. यामुळे नव्याने नोंदविल्या गेलेल्या मतदारांच्या कागदपत्राची उच्चस्तरीय समितीने पडताळणी करावी, अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.हे नवमतदार नेमके कोणत्या विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये नोंदले गेले, तसेच किती मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले याची माहिती द्यावी. नवीन मतदार नोंदणी तसेच यंदा लोकसभा निवडणुकीत झालेले वाढीव मतदान यांच्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यताही यांनी व्यक्त केली. जोपर्यंत बुथनिहाय मतदानासंदर्भात माहिती मिळत नाही तोपर्यंत २३ मे रोजी होणाºया मतमोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले आहे. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत त्यांना माहिती उपलब्ध झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.याचिका केली दाखलपालघर नागरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची नोंद करण्यात आल्याची पुराव्यासह माहिती शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते कैलास म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील आदींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयासह निवडणूक आयोगाकडे दिली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवीत याचिकाही दाखल केलेली आहे. या बोगस मतदारांसंदर्भातील तक्र ारी केल्यानंतर त्याची मागितलेली माहितीही दिली जात नसल्याने प्रशासनातील काहींचा यात समावेश असल्याची शंका पालघर शहरातून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर