ओएलएक्सद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:25 IST2018-06-07T01:25:26+5:302018-06-07T01:25:26+5:30
ओएलएक्स अॅपद्वारे मोबाईल विक्रीकरीता दिलेल्या जाहिराती पाहून गि-हाईकांना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून त्याची फसवणूक करणा-या दिपक तिवारी (२२) चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.

ओएलएक्सद्वारे फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक
पालघर : ओएलएक्स अॅपद्वारे मोबाईल विक्रीकरीता दिलेल्या जाहिराती पाहून गि-हाईकांना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून त्याची फसवणूक करणा-या दिपक तिवारी (२२) चोरट्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ६० हजाराचा ऐवज ही जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
अॅपद्वारे आपला मोबाईल विक्र ी करिता दिलेल्या जाहिराती पाहून या गिºहाईकाना माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलावून आरोपी ओला टॅक्सी घेऊन उभा राहत असे. पुढे माझी बायको अथवा गर्लफ्रेंड उभी आहे, तिला मोबाईल दाखवतो आणि तिला पसंत पडल्यास पैसे आणून देतो असे आरोपी मोबाईल विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस सांगून मोबाईल घेऊन पळून जात असे. माणिकपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी अंबाडी रोड वरील जैन मंदिरा जवळ सापळा रचला. मूळचा मुंब्रादेवी कॉलनी, दिवा येथे राहणाºया आरोपी दिपक तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता जुने मोबाईल विकणाºया अनेकांना आपण फसविल्याचे त्याने कबूल केले.