अंगणवाडीच्या बांधकामावरून वाद
By Admin | Updated: March 25, 2017 01:00 IST2017-03-25T01:00:13+5:302017-03-25T01:00:13+5:30
जांबुगाव येथील शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधताना जमिनीच्या हक्कावरून हरकत घेतल्याने स्थानिकांना लढा देण्याची वेळ

अंगणवाडीच्या बांधकामावरून वाद
बोर्डी : जांबुगाव येथील शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधताना जमिनीच्या हक्कावरून हरकत घेतल्याने स्थानिकांना लढा देण्याची वेळ आली आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने बुधवारी ग्रामस्थांनी घोलवड पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.
जांबुगाव ग्रामपंचायती अंतर्गत शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत मोडकळीस आल्याने आपला गाव आपला विकास याद्वारे दुरु स्तीसाठी कृतीआराखड्यात ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार ६ लक्ष ६० हजाररूपयांचा मंजूर विकास निधी मार्च अखेर खर्च करावयाचा आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करण्यापूर्वीच मयोद शहा यांनी जमिनीच्या मालकीवरून बांधकामास हरकत घेत सदर बांधकामाकरिता आग्रही असलेल्या कुणाल निमला आणि महेंद्र वंजारा या ग्रामस्थांविरु द्ध पोलीसात तक्र ार दाखल केली.
या बाबत संबंधितांना घोलवड पोलिसांनी ठाण्यात बोलावल्याने बुधवार, २२ मार्च रोजी त्यांचे समर्थक असलेल्या ३०० ग्रामस्थांचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता.
धिरजलाल जव्हेरचंद्र शहा यांनी १९८१ साली सर्वे नं. ४०३ हिस्सा क्र मांक ४ व ५ चे ० - १७ हेक्टर क्षेत्र जिल्हा परिषदेच्या भिणारी शाळेला दान दिल्याचे कागदोपत्री नमूद आहे.
येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली होती. मात्र, गत काही वर्षांपासून ही इमारत मोडकळीस आल्याने शाळा लगतच्या धोडी यांच्या ओटीवर भरविण्यात येत होती.
दरम्यान, पेसाअंतर्गत निधीतून अंगणवाडी इमारतीची दुरूस्ती हाती घेतल्यानंतर जमिनीच्या मालकीवरून मयोद धिरजलाल शहा यांनी हरकत घेतल्याने इमारत बांधकामात व्यत्यय निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे आंगणवाडी बंद पडल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे.
मात्र दुर्बल व वंचित घटकांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे या पाद्यावरील आदिवासींचे म्हणणे
आहे. लोकप्रतिनिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. (वार्ताहर)