तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:00 IST2020-01-08T01:00:18+5:302020-01-08T01:00:23+5:30

तरुण विरार पूर्वेकडील कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता ललितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

The death of a young man drowned in a lake | तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

नालासोपारा : मुंबईच्या घाटकोपर येथील पंतनगर परिसरातील नायडू कॉलनीमधील चाळीत राहणारा ललित शांताराम पवार (१९) हा रविवारी त्याच्या कंपनीमधील मित्र मधुर, सागर जाधव, अंकुश कांबळे आणि अमित थोपट यांच्यासोबत विरार येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. मैदानात क्रिकेट खेळल्यानंतर या तरुणांनी मद्यपान केले. त्यानंतर हे तरुण विरार पूर्वेकडील कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता ललितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, ललितची आई रेणुका पवार (४१) यांनी सोमवारी विरार पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The death of a young man drowned in a lake