वाड्यात कारमध्ये आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:04 IST2018-10-16T00:03:51+5:302018-10-16T00:04:18+5:30
वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोलनाक्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान एका ...

वाड्यात कारमध्ये आढळला मृतदेह
वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोलनाक्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान एका संशयीत कारची तपासणी केली असता तिच्या डिक्कीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींसह कार ताब्यात घेण्यात आली आहे. नारायणलाल चंपालाल सेवक (२९ ) असे मृत तरु णाचे नाव असून तो सध्या माणिकपूर येथे राहत होता.
वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोल नाक्यावर पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरक्षिक प्रकाश कदम व ज्ञानदेव सूर्यवंशी हे आपल्या सहकाºयांसह सोमवारी पहाटेच्या सुमारास नाकाबंदी करत असता त्यांनी फोर्ड पिगो नंबर एम. एच. ०३ सी. पी. ६३३४ या कारची तपासणी केली असता हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याच कार मधील आरोपी मदनलाल सावक व श्रवण सावक या दोघांना गाडीसह ताब्यात घेतले. या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा स्टेशनचे पो नि सुदाम शिंदे यांनी हा गुन्हा माणिकपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने माणिकपूर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
ब्लॅकमेलिंगचे प्रकरण
आरोपी मदनलाल याची पहिली पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले होते. ही हकीकत पहिल्या पत्नीला सांगेन म्हणून मृत तरूण आरोपीकडून वारंवार ब्लॅकमेलिंग करून पैसे उकलत होता. १४ आॅक्टोबर रोजीही त्याने अशीच पैशांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीने नारायणलाल याला घरी बोलावून गळफास देऊन त्याची हत्त्या केली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.