शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बारडा डोंगरावर झाले चकाकणाऱ्या वनस्पतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:04 IST

तब्बल अडीच तासांपेक्षा अधिक वेळ अविरत चढून पश्चिम घाटातील ऐतिहासिक बारडा डोंगराचे शिखर सर करून भक्तांनी बारडा देवतेचे दर्शन घेतले.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : मुसळधार पाऊस, हुडहुडी भरणारी थंडी आणि कानठळ्या बसवणा-या ढगांच्या गडगडाटात, घनदाट झाडीतून दगड - धोंड्याची निसरडी उभी चढाई. तब्बल अडीच तासांपेक्षा अधिक वेळ अविरत चढून पश्चिम घाटातील ऐतिहासिक बारडा डोंगराचे शिखर सर करून भक्तांनी बारडा देवतेचे दर्शन घेतले.दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्यातील पितृ बारशीच्या मध्यरात्री डोंगरावरची प्रकाशित होणारी वनस्पती पाहाण्याकरिता गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी बारशीच्या रात्री शेकडो भक्त येथे मुक्कामाला गेले होते. त्यांंनी यावेळी तारपानृत्याद्वारे धार्मिक भावना व्यक्त करून निसर्ग देवतेचे आभार व्यक्त केले. पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये महाराष्ट्र - गुजरात सीमेलगत बारडा हा ऐतिहासिक डोंगर असून या पट्ट्यात त्याची उंची सर्वाधिक आहे. द्रोणागिरीवर प्रकाशित होणा-या औषधी वनस्पतीचा उल्लेख रामायणात आला आहे. त्याची अनुभूती घेण्याचे भाग्य भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात मिळते. बारशीची मध्यरात्र ते सूर्योदयापर्यंत हा अद्भुत नजरा पाहता येतो. अनुभवी वैद्य तर या वनस्पतीचा काही भाग औषधी वापरासाठी करतात.गेल्यावर्षीपेक्षा यंदा मुबलक पाणी पडल्याने विविधरंगी फुलांचे ताटवे फुललेले होते. शिखरावरच्या पाच-सहा एकरातल्या पूर्वेकडील पठाराच्या भागावर पिवळ्या फुलांचा पसरलेला हा ताटवा नयनरम्य दिसत असल्याची भावना वेवजी गावातील हसमुख दुबळा यांनी व्यक्त केली. चार वर्षांतून एकदा फुलल्यानंतर नामशेष होणाºया कारवीची रोपटी यंदा फुलली नव्हती. या वनस्पतीपासून आदिवासी झोपड्यांचे कुड (लाकडी भिंत) बनवतात. या वर्षी अधिक पाऊस झाल्याने चकाकणाºया वनस्पती अधिक प्रमाणात दिसल्याचे तो म्हणाला.बारडा हा पश्चिम घाटातील सर्वात उंच डोंगर आहे. त्याच्या सीमा डहाणूतील अस्वाली, कैनाड, धामणगाव, गांगनगाव आणि तलासरी तालुक्यातील वेवजी, करजगाव, गिरगाव येथे पसरल्या असून येथून माथ्यापर्यंत जाता येते. बोर्डी वनपरीक्षेत्राअंतर्गत हा भाग येतो.चढाई करताना अनुभवलेला हा वीस-पंचवीस वर्षांच्या काळातील सर्वाधिक पाऊस होता. धुके, निसरडी पायवाट यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. डोंगरमाथ्यावर पाषणात कोरलेली गुहा, भूचर, पाण्याच्या टाक्या तसेच तलावात नेहमीपेक्षा अधिक पाणी होते. शेकोटी पेटवताना रात्रभर झालेली दमछाक आणि वनस्पती दिसल्यानंतर झालेला आनंद थकवा घालवणारा होता. सकाळी बारडा दैवताचे दर्शन घेतले.- हसमुख दुबळा, ग्रामस्थ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार