शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

देसलेची अपसंपदा करोडोंची, शिक्षक दलालाच्या भूमिकेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:34 IST

धुळ्यातील घरावर छापा : १४ लाखांची रोकड, दस्तऐवज हस्तगत, शोध जारीच

पालघर : जि.प.च्या माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी मोहन देसले याला १ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या धुळे येथील घराची झडती घेतली असता १४ लाख २० हजाराची रोकड व कोट्यवधीच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार शिक्षकाची नियमानुसार नियुक्ती झाल्याने त्यांना त्वरीत मान्यता देऊन पगार काढण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता देण्यासाठी जाहिरात दिल्याची प्रत आणि संबंधित कागदपत्रे आणून देण्याचा तगादा त्या शिक्षकाकडे लावला. अनेक फेºया मारून कंटाळलेल्या त्या शिक्षकाने बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कांबळे यांच्या मदतीने पालघरच्या लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठले.या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या ३ लाखाच्या लाचेची मागणी केल्यानंतर २ लाखांवर तडजोड झाली. २८ डिसेंबर २०१८ रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.त्यानंतर त्यांच्या मधील संभाषण ऐकल्यावर देसले यांच्यावर चार वेळा ट्रॅप लावण्यात आला. मात्र, तो अयशस्वी झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयामागे पैसे घेऊन बोलावल्याचा निरोप आला. पालघरमधील एका शिक्षकांच्या गाडीत सर्व बसलेले असतांना १ लाखाची रक्कम स्वीकारतांना देसले याला रंगेहाथ पकडण्यात आले.लाचलुचपत विभागाने तात्काळ त्याच्या धुळे येथील बंगल्यावर छापा घातला. यावेळी त्यात १४ लाख २० हजाराची रोकड व कोट्यवधी रुपयांच्या १८ विविध प्रकारच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत.अनुकंपा भरती घोटाळा, सेवक समायोजन घोटाळा, बायोमेट्रीक मशिन घोटाळा, प्रयोगशाळा साहित्य खरेदी घोटाळा अशा घोटाळ्यांपाठोपाठ आता ही लाचखोरी घडल्याने जि.प. मध्ये नवीन वादळ उठले आहे. सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे.शिक्षक दलालाच्या भूमिकेत? सोशल मिडियावर ट्रॉलजिल्हापरिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाºयांना एक लाखाची लाच घेताना पकडल्याच्या प्रकरणात एका शिक्षकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. अशी जोरदार चर्चा पालघर मध्ये सुरू आहे. दरम्यान, शिक्षकच दलालांची भूमिका बजावत असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर होते आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही शिक्षक सध्या दलालांची अथवा कमिशन एजंटांची भूमिका बजावत असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार