शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

रात्रीच्या अंधारात अर्नाळा समुद्रकिनारी होतेय रेतीचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:50 AM

अर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही

ठळक मुद्देअर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही

विरार : अर्नाळा समुद्रकिनारी रात्रीच्या अंधारात होत असलेल्या रेतीचोरीमुळे अर्नाळावासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यासमोरच रेतीमाफिया धूडगूस घालत असतानाही पोलिसांना याची खबर नसल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे. अर्नाळा समुद्रकिनारी होत असलेल्या या रेतीचोरीकडे लक्ष वेधण्यासाठी व कारवाई केली जावी, यासाठी अर्नाळा ग्रामपंचायतीने महसूल आणि अर्नाळा पोलिसांना १९ जुलै व ६ ऑगस्ट २०१८ साली पत्र दिले होते; मात्र अद्याप या पत्रावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

अर्नाळा समुद्रकिनारी राजरोस होत असलेल्या रेतीचोरीमुळे समुद्र किनाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास त्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, त्यांचा बुडून मृत्यू होतो. अशाप्रकारे आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचे जीव गेले आहे.सततच्या रेतीउपशामुळे परिसरातील घरांत समुद्राचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण होण्याची भीती अर्नाळा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर, परिसरातील शेती आणि विहिरीचे पाणीही खारट होत असल्याची या ग्रामस्थांची तक्रार आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने या रेतीचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी अर्नाळा ग्रामपंचायतीने या पत्राद्वारे केली होती. अन्यथा; ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होईल, अशी भीतीही व्यक्त केली होती.

अर्नाळा ग्रामपंचायतीने २०१८ साली पत्र दिले असेल, तर आमच्या कार्यालयाने काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. याबाबत माहिती घेते.- उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई

आम्ही सातत्याने अशी कारवाई करत असतो. आजही आम्ही कारवाई करण्यासाठी गेलो होतो; पण असा काही प्रकार आमच्या निदर्शनास आलेला नाही. असा काही प्रकार घडत असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले असेल, तर त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावे, आम्ही नक्की कारवाई करू.- महेश शेट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार