डहाणू रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांचे लोकार्पण

By Admin | Updated: February 5, 2017 02:19 IST2017-02-05T02:19:09+5:302017-02-05T02:19:09+5:30

डहाणू रेल्वे स्थानकात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले सुशोभिकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यातील सोयी सुविधांचे शुक्रवारी डहाणू रेल्वे स्थानकात

Dahanu railway station facility | डहाणू रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांचे लोकार्पण

डहाणू रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांचे लोकार्पण

डहाणू : डहाणू रेल्वे स्थानकात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले सुशोभिकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यातील सोयी सुविधांचे शुक्रवारी डहाणू रेल्वे स्थानकात पुरक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन रेल्वेचे महाप्रबंधक जी.सी अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. तसेच महाप्रबंधकाच्या हस्ते रेल्वे स्थानकातील कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
दरम्यान प्रथम श्रेणी प्रतिक्षालय, सुलभ शौचालय याचेही उदघाटन करु न लोकार्पण करण्यात आले. या वेळी डहाणू रेल्वे स्थानकातील नियोजित कार्यक्र माची वेळ ४:५५ ची होती. मात्र महाप्रबंधकाना तीन तास उशिर झाला. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी विविध मागण्या आणि तक्रारी त्यांना सांगण्यासाठी दुपारपासूनच हजेरी लावली होती. मात्र वापी, बलसाड या रेल्वे स्थानकात उशीर झाल्याने त्यांना विलंब झाला. यावेळी मंडल रेल प्रबंधक मुकुल जैन, पश्चिम रेल्वेचे मुख्य इंजिनियर प्रविणकुमार मिश्रा, तसेच बलसाड ते मुंबई दरम्यानचे शेकडो अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे महाप्रबंधकांना निवेदन
बोर्डी : पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक जी. सी. अग्रवाल यांनी शुक्र वार, ३ फेब्रुवारी रोजी विरार ते सुरत यादरम्यानच्या रेल्वे स्थानकांचे इन्स्पेक्शन केले. या दरम्यान विविध रेल्वे वसाहती व नवीन प्रकल्प, स्थानकावरील सुविधा आदींची पाहणी केली. या वेळी त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनांशी संवाद साधला.
वेस्टर्न रेल्वे ट्रॅकमेंटेनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भोईर यांनी मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. कर्तव्य बजावत असतांना उघड्यावर जेवावे लागणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, शौचालयांची कमतरता अशा समस्यांचा समावेश त्यात होता. योग्यतेनुसार रेल्वेच्या विभागीय परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करणे, पगारात ३० टक्के हार्डड्यूटी रिस्क अलाउन्स देणे या प्रमुख मागण्या आहेत.
तर जीडीसीई नुसार रेल्वे भर्तीच्या वेळी बोर्डाच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के कोटा लागू करणे, विविध भत्ते देणे, रेल्वे फाटकांवर तैनात गेटमनच्या कामाच्या शिफ्टचे आठ तास निश्चित करणे, चार तासांचा ओव्हर टाईम देणे, गेट केबिन मध्ये पाणी व शौचालायची सुविधा पुरविणे, रात्रीच्या गस्तीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच त्यांच्या कार्यक्षेत्राचे अंतर कमी करणे, किमॅनच्या सोबतीला ट्रॅकमॅन पाठविणे आदि मुद्यांचा त्या मध्ये समावेश आहे.

Web Title: Dahanu railway station facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.