एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीचे दाखले : डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे पद धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:39 AM2018-07-10T03:39:44+5:302018-07-10T03:39:59+5:30

नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 Dahanu city councilor Goihil's post threatens danger? | एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीचे दाखले : डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे पद धोक्यात?

एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीचे दाखले : डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे पद धोक्यात?

Next

- शौकत शेख
डहाणू : नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
विद्यमान नगरसेवक निमिल गोहील यांनी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विमुक्त जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. ह्या जात प्रमाणपत्रामध्ये त्यांची जात हिंदू - सलाट (विमुक्त जाती जमाती) अशी नमूद केले आहे. दरम्यान निमिल गोहील यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये निमिल यांच्या वडिलांची जात हिंदू- कढिया अशी नमूद आहे. ही जात इतर मागास वर्गामध्ये मोडते. त्यामुळे जात पडताळणी समितीने निमिल यांचे प्रमाणपत्र रोखून धरले.
निमिल गोहिल यांचे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीमधील तफावतीचा आधार घेत समितीने आक्षेप घेतला आहे. साहजिकच ह्या त्रुटीमुळे निमिल यांना मुदतीत जात पडताळणी पत्र प्राप्त करता आलेले नाही. दरम्यान ६ महीन्यांची मुदत संपल्यामुळे डहाणू नगरपालिका प्रशासनाने निमिल यांना २८ जून रोजी नोटीस देखील बजावली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्राचा मुद्दयावर लक्ष्य करुन विरोधकांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे डहाणूच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.
निमिल हे डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग ६ अ मधून निवडून आले होते. त्यांना नियमानुसार ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ही मुदत संपल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. याला ते कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर माझ्या जात प्रमाणपत्राबाबतीत केलेले आरोप खोडसाळपणे केले असून त्यात काहीच तथ्य नाही. तक्रारदाराकडे तसे काहीच पुरावे नसल्याचे सांगून त्यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.
त्यांना नगर परिषदेने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस दिल्यानंतर विरोधकांनी याकडे त्यांना अडचणीत आणण्याची संधी म्हणून पाहीले आहे. उमेदवारी अर्ज सादर करतांना शपथपत्रामध्ये ६ महीन्याच्या आत जातपडताळणी वैध प्रमाणपत्र देणे आवश्यक असताना ते सादर करण्यात न आल्याने राष्ट्रवादीने व्यक्ती एक सर्टीफिकेट दोन या मु्द्याचे भांडवल करुन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. आता त्यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार शशिकांत बारी यांनी देखील वकील मोहन वंजारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांचेकडे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. गोहिल यांनी त्यांचे विमुक्त जातीचे प्रमाणपत्र अमान्य झाल्यानंतर त्वरीत उप विभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन इतर मागासवर्गीय असल्याचे नवे प्रमाणपत्र मिळवून ते जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे.

माझी जात विमुक्त जातीमध्ये समाविष्ट नसून इतर मागासवर्गीयांत समाविष्ट आहे असे जात पडताळणी समितीने कळविल्यामुळे मी नव्याने इतर मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र मिळवून ते समितीकडे सादर केले आहे. या आधी मला चुकीचे प्रमाणपत्र दिले गेले, यात माझा काहीही दोष नाही. नवे प्रमाणपत्र मिळाले की मी ते सादर करेन.
- निमिल गोहिल, विद्यमान नगरसेवक

Web Title:  Dahanu city councilor Goihil's post threatens danger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.