शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-बोर्डी मार्ग धोकादायक

By admin | Updated: March 13, 2016 02:16 IST

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून

बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून संपूर्ण राख रस्त्यावर पसरली. दिवसभर राखेचा ढिगारा हटविण्यात न आल्याने वाऱ्यामुळे राखेचे कण डोळे व नाकातोंडातून जात नागरीकांना त्रास सोसावा लागला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळी नसून डहाणू पोलीस घडल्या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या मार्गावरील अवजड व अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवैध रेती व क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतुक केली जाते. रात्रीच्या सुमारास राखेने भरलेली वाहन सुरू असतात. रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेली राख वाऱ्यामुळे डोळे व नाकातोंडात जाऊन प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. प्रशासनाकडून आरोप फेटाळले जातात. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून घडलेल्या अपघातात राखेचा ढिगारा रस्त्यावर पसरला. झाडाचे नुकसान झाले असून वाहनाच्या फुटलेल्या काचांचे अवशेष धुम्रपानाचे साहित्य घटनास्थळी पडले होते. दिवसभर राखेचा ढिगारा उपसण्यात आला नव्हता. या अपघाताची डहाणू पोलीस ठाण्यात नोंद नसुन अपघातानंतर वाहनासह चालक पळून गेला.घटनास्थळापासून डहाणू पोलीस ठाण्याअंतर्गत नरपड सागरी पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र नागरीकांनी मागणी करूनही चौकीवर पोलीस तैनात नसतात. त्यामुळे अवैध व जड वाहतुकीचे पेव फुटले आहे. रात्री आठ वाजेनंतर मार्गावरील प्रवास नागरीकांना धोकादायक वाटतो. पोलीसांनी वेळीच दखल न घेतल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारला येत नाही. (वार्ताहर)