डहाणूमध्ये ६० हजारांची घरफोडी; गुन्हेगारी वाढली

By Admin | Updated: January 28, 2017 02:32 IST2017-01-28T02:32:27+5:302017-01-28T02:32:27+5:30

शहरातील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणे, पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास

Dahanu 60 thousand burglary; Crime grew | डहाणूमध्ये ६० हजारांची घरफोडी; गुन्हेगारी वाढली

डहाणूमध्ये ६० हजारांची घरफोडी; गुन्हेगारी वाढली

डहाणू : शहरातील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणे, पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास करण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रामवाडीतील रामजी पार्क भागात घरफोडी होऊन चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील ४५ हजार रोख तसेच १५ हजारांचे चांदीचे साहित्य असा एकूण ६० हजार ऐवज लांबवला. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात आशा अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dahanu 60 thousand burglary; Crime grew