शिवरायांच्या अवमानप्रकरणी वसईमध्ये तिघांविरोधात गुन्हा

By Admin | Updated: March 25, 2017 01:09 IST2017-03-25T01:09:00+5:302017-03-25T01:09:00+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर योगी आदित्यनाथांचा मुखवटा लावून विटंबना केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात

Crime against the three accused in Shivaji's insult Vasai | शिवरायांच्या अवमानप्रकरणी वसईमध्ये तिघांविरोधात गुन्हा

शिवरायांच्या अवमानप्रकरणी वसईमध्ये तिघांविरोधात गुन्हा

वसई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर योगी आदित्यनाथांचा मुखवटा लावून विटंबना केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस चौकशी सुरु असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
रविवारी भाजपप्रेमी अमित मिश्रा, संदीप सिंग आणि राकेश सिंग यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आरुढ असलेल्या प्रतिमेतील चेहऱ्यावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुखवटा लावला होता. तसेच ते छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against the three accused in Shivaji's insult Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.