अनधिकृत नळप्रकरणी सात विकासकांवर गुन्हे

By Admin | Updated: August 22, 2015 22:43 IST2015-08-22T22:43:53+5:302015-08-22T22:43:53+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीगळती व पाणीचोरीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

Crime against seven developers for illegal encroachment | अनधिकृत नळप्रकरणी सात विकासकांवर गुन्हे

अनधिकृत नळप्रकरणी सात विकासकांवर गुन्हे

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीगळती व पाणीचोरीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान नालासोपारा शहरात ७ विकासकांवर अनधिकृतरीत्या नळजोडणी घेतल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाणीगळती व पाणीचोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७ विकासकांनी आपल्या १० इमारतींना महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे नळजोडण्या घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, पाणीपुरवठा विभागाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against seven developers for illegal encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.