खंडणीखोर डॉक्टरविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 26, 2017 02:36 IST2017-03-26T02:36:15+5:302017-03-26T02:36:15+5:30
वसईतील एका बिल्डरकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वसईतील डॉक्टर आणि माहिती

खंडणीखोर डॉक्टरविरुद्ध गुन्हा
वसई : वसईतील एका बिल्डरकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वसईतील डॉक्टर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता डॉ. अनिल यादव यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीच्या रकमेतील दीड लाख रुपये स्वीकारताना त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. हे कळताच डॉक्टर फरार आहे.
वसईतील एका बिल्डरने जुन्या चाळीचा पुर्नविकास करून बेकायदा इमारत बांधली आहे. याप्रकरणी डॉ. यादव यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याप्रकरणी तक्रार करू नये म्हणून डॉ. यादव यांनी बिल्डरकडे पंचवीस लाखांची खंडणी मागितली होती. बिल्डरने त्याला दोन लाख दिले होते. तो उर्वरित खंडणीसाठी दबाव टाकत असल्याने बिल्डरने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. (प्रतिनिधी)