नालासोपाऱ्यातून दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: January 13, 2016 00:26 IST2016-01-13T00:26:09+5:302016-01-13T00:26:09+5:30

नालासोपारा शहरातील एका ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या दोन सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. अमित नाईक उर्फ बाबू नेपाली उर्फ राजेंद्र यादव (२४) व जाफर

Crackers arrested from the cavalcade | नालासोपाऱ्यातून दरोडेखोरांना अटक

नालासोपाऱ्यातून दरोडेखोरांना अटक

वसई : नालासोपारा शहरातील एका ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या दोन सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
अमित नाईक उर्फ बाबू नेपाली उर्फ राजेंद्र यादव (२४) व जाफर रज्जाक शेख (३०) अशी अटक आरोपींची नावे असून ते दोघे कांदिवली पोईसर येथील रहिवासी आहेत.
नालासोपारा पूर्व एव्हरशाईनसिटी भागातील आचोळे डोंगरी जवळ दोन तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दोघांची झडती घेतली असता राजेंद्र यादवकडे चॉपर तर जाफरकडे लाल मिरची पावडर आणि
नायलॉनची दोरी सापडली. दोघांना तुळींज पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याचे त्यांनी कबुल केले असल्याचे सपोनि सुनील जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Crackers arrested from the cavalcade