तलासरी तहसीलवर माकपाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 23:07 IST2015-08-13T23:07:56+5:302015-08-13T23:07:56+5:30

या भागातील बंद असणारे कारखाने सुरू करून आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यात यावा. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध कराव्या, पेसा कायदा प्रभावी राबविण्यात यावा आदी

CPI-M's Front at Talasi Tehsil | तलासरी तहसीलवर माकपाचा मोर्चा

तलासरी तहसीलवर माकपाचा मोर्चा

तलासरी : या भागातील बंद असणारे कारखाने सुरू करून आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यात यावा. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध कराव्या, पेसा कायदा प्रभावी राबविण्यात यावा आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसीलवर बुधवारी मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांना दिले. या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अशोक ढवळे, बारक्या मांगात, तलासरी पंचायत समिती सभापती वनशा दुमाडा इ.सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पीकपाण्याला आदिवासी खातेदारांची नोंद घेणे, केरोसिनचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे, कुर्झे धरणातील पाणी तलासरी तालुकयातील शेतकऱ्यांना देण्यात यावे इ.सह अनेक मागण्या करण्यात आल्या. इ. मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली. या वेळी तहसील कार्यालयात उपस्थित गटविकास अधिकारी राहुल धूम, बांधकाम खात्याचे करजोड, वीज वितरण कंपनीचे सचिन भांगरे यांनी आपल्या खात्याशी संबंधित प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. (वार्ताहर)

Web Title: CPI-M's Front at Talasi Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.