शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नगरसेवकांची नावे मतदारयादीतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:44 AM

मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, भाग, घर क्र मांक, मोबाईल नंबर, इमेल नंबर, आदी महत्वपूर्ण माहिती आॅनलाइन अथवा आॅफ लाईन (कागद पत्रात) द्वारे निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवायची असते.

पालघर : येथील नगरपरिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या उमेदवारांसह अन्य आजी-माजी विद्यमान नगरसेवकांची नावेच मतदार यादीतून गायब करण्याचा प्रकार उघडकीस आला असून दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या पाशर््वभूमीवर या प्रकारची गंभीर दखल घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी तक्र ारदार नगरसेवकांनी केली आहे.

मतदान यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, भाग, घर क्र मांक, मोबाईल नंबर, इमेल नंबर, आदी महत्वपूर्ण माहिती आॅनलाइन अथवा आॅफ लाईन (कागद पत्रात) द्वारे निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवायची असते. त्याप्रमाणे पालघर मधील हजारो मतदारांनी पालघर तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक शाखा आणि संकेत स्थळावर नोंदवली गेली होती. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा बीएलओच्या मार्फत मतदारांच्या घरा-घरात जाऊन केल्या गेल्या नंतर संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केली जातात. पालघर मधील बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी राजेश त्रिपाठी यांनी पालघर तहसीलदार कार्यालयात माहितीच्या अधिकारात पालघर लोकसभा मतदार संघातील पालघर, बोईसर, डहाणू, विक्र मगड, नालासोपारा, वसई या विधानसभेतील मतदार संघामध्ये नोंदविण्यात आलेल्या नवीन मतदारांची नवीन नोंदणी, नावे वगळणे, स्थलांतरित यादी त्यांना लागणारे नियम याची माहिती मागविली होती. त्या माहितीत सहाही मतदार संघातील मतदारांची नावे समाविष्ट करताना कागदपत्रांची तपासणी, घरात राहतो की नाही आदी बाबीच्या खातरजमा बाबत बीएलओ कडून दक्षता बाळगण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी पालघर नगर परिषद निवडणुकी मधील अल्याळी वार्डातील सुमारे १५० मतदारांची नावेच गायब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नगर परिषदेच्या २०१४ च्या निवडणुकीत ही अल्याळी गावातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित मतदारांनी या बाबत तहसीलदारा कडे तक्र ारही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादीच्या विद्यमान नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता पाटील, नगर सेवक मकरंद पाटील, सेनेचे नगरसेवक जितेंद्र पामाळे, माजी नगरसेवक भावानंद संखे आदींची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.एका विशिष्ट पक्षाचे उमेदवार आणि मतदार वगळता अन्य बहुतांशी पक्षाच्या उमेदवारांची आणि मतदारांची नावेच गायब केली जात असल्याचे षडयंत्र सुरू असून जिल्हा निवडणूक विभागाने याचा शोध घेण्याची मागणी त्रिपाठी यांनी केली आहे. एका अज्ञात इसमाने आॅनलाइन अर्जाद्वारे माजी नगरसेवक भावानंद संखे याचे नाव कमी करण्याचा अर्ज केल्याचे समोर आले असून काही विशिष्ट लोका कडून राजकीय अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीने ‘सायबर क्र ाईम’ चा वापर केला जात असल्या आरोप होत आहे.सदर तक्रारी बाबत शहानिशा करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत.- डॉ.किरण महाजन, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक