Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:00 AM2020-03-20T02:00:42+5:302020-03-20T02:01:45+5:30

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे.

Coronavirus : ST in Economical trouble | Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

Next

- हितेन नाईक
पालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसमध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी घेण्याचे शासनाचे आदेश एस.टी. विभागाच्या आर्थिक उत्पनावर घाला घालणारे ठरणारे आहेत. आर्थिक उत्पनाच्या चक्रव्यूहात आधीच रुतलेले एसटीचे चाक या आदेशाने अधिक खोलवर रुतणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान आता पालघर परिवहन विभागासमोर उभे ठाकणार आहे.

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्याच्याशी अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने रेल्वे, मेट्रो, एसटी बसेस, खाजगी बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे. एस.टी.मधील उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आता एस.टी.मध्ये प्रवेश नाकारला जाणार असून क्षमतेपेक्षा अर्ध्या (फक्त २१) प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.

पालघर परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारांतून दररोज एस.टी. बसच्या ३ हजार ३७४ फेºयासह १ लाख ४३ हजार किमीचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयाद्वारे दररोज २१ हजार १३८ किमीचा प्रवास पार केला जातो तर सफाळे आगराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ कि.मी., वसई आगराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०.४०.६ किमी, जव्हारच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ कि.मी., बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा प्रवास पार पाडत एस.टी.चे चालक आणि वाहक एस.टी. विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.

१० लाख रुपयांचा तोटा

पालघर जल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्याने एस.टी. बसने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या घटली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस, लग्न समारंभ, राजकीय समारंभ, धार्मिक समारंभ, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रवासी घटले असून गुरुवारी पालघर विभागाला सुमारे १० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती एस.टी.चे विभागीय नियंत्रक आशीष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Coronavirus : ST in Economical trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.