शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

CoronaVirus: पोलीसदादा, जरा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या; ताण पुन्हा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 23:10 IST

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम : पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला

मंगेश कराळेनालासोपारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे जागोजागी नाकाबंदी, बंदोबस्त लावण्यात आल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्येतीची व आरोग्याची काळजी घरच्यांसह त्यांच्या लहान मुला-मुलींनाही आता वाटू लागली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ७५ टक्के पोलीस अधिकारी, महिला व पोलीस अंमलदारांनी आतापर्यंत कोरोनाची पहिली लस घेतली आहे तर ५० ते ६० टक्के पोलिसांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे. 

राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी व मनाई आदेशाचा भंग होऊ नये, विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी आणि गर्दी न करण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर उतरले आहेत. पण तरीही काही नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत.

यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, हे थांबणे गरजेचे असल्याने फ्रंटलाईन सेवा देण्यासाठी उतरणाऱ्या पोलिसांबद्दल नागरिक अद्यापही गंभीर नाहीत. पोलीस प्रशासन वेळोवेळी आवाहन करत असतानाही नागरिक त्याकडे कानाडोळा करत आहेत. काही पोलीस अधिकारी व अंमलदारांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या परिवारातील सदस्य बाधित झाले असून, तेही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारPoliceपोलिस