Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:12 IST2020-04-09T23:11:26+5:302020-04-09T23:12:22+5:30
तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी !
वसई :- मागील आठवड्यात वसई रोड पश्चिमेच्या साईनगर परिसरात अमेरिकेहून वसईत घरी परतलेली 34 वर्षीय तरुणी त्यावेळी वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाली होती. तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, आनंदाची बातमी अशी की याच तरुणीवरील उपचारानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली असून तिची पुन्हा कोरोना विषाणूची तपासणी केली असता तिचा अहवाल आता निगेटिव्ह आल्याचे पालिकेच्या वतीनं गुरुवारी उशिरा सांगण्यात आले.
याउलट या 34 वर्षीय तरुणीला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यांत आला असून, पुन्हा खबरदारी म्हणून या तरुणीला आता होम क्वारंटाईन करण्यांत आले आहे. अर्थातच कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर पूर्णपणे मात करून बरी झालेली ही 34 वर्षीय तरुणी वसई विरार शहरामधील पहिलीच तरुणी ठरल्याने नक्कीच ही बाब वसईकरांना दिलासा देणारी ठरत असल्याचे ही महापौरांनी स्पष्ट केलं.