शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आश्रमशाळा ‘हाॅटस्पाॅट’, हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 10:00 IST

नंडोरे आश्रमशाळेत ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे.

पालघर : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पालघरमधील नंडोरे आश्रमशाळेतही एका शिक्षकासह २४ विद्यार्थिनी आणि ६ विद्यार्थी असे एकूण ३१ जण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आश्रमशाळा कोरोना हाॅटस्पाॅट ठरत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष पुरविले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नंडोरे आश्रमशाळेत ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघड झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे. त्याच वेळी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर पालकांच्या आई-वडिलांनी आश्रमशाळेकडे धाव घेत शाळेला घेराव घातला. आपल्या मुलांची आम्हाला भेट हवी, असे सांगून काही पालकांनी आपल्या पाल्यांना घरी घेऊन जायची मागणी केली. यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी आपल्या पाल्यांवर योग्य ते औषधोपचार करून त्यांची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिल्यावर पालकांनी आपला आग्रह सोडला.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूअंतर्गत नंडोरे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ९वी ते १२वीपर्यंतचे १६२ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी ३४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. सोमवारी तीन विद्यार्थिनींना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यानंतर त्यांची तपासणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ आश्रमशाळा प्रशासनाने अन्य सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या तपासणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्या अहवालात २४ विद्यार्थिनी, ६ विद्यार्थी व एक शिक्षक अशा ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.आश्रमशाळा व परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीरकोरोनाची लागण झालेल्या व लक्षणे असलेल्या ९ विद्यार्थिनींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर सौम्य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगीकरण कक्ष उभारून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी दिली. संपूर्ण आश्रमशाळेची वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून आश्रमशाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.जव्हारनंतर नंडोरेतही रुग्ण : ३१ बाधितांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा