बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

By Admin | Updated: March 24, 2017 00:55 IST2017-03-24T00:55:06+5:302017-03-24T00:55:06+5:30

विक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम

Contracts based on bogus documents | बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

हितेन नाईक / पालघर
विक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक ठेके एका कंत्राटदाराने मंजूर करवून घेतले असून त्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर चालढकल करीत आहेत.
केव गावातील सर्व्हे नंबर २५७ हि जमीन विकास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असून पूर्णत: बागायती क्षेत्र आहे.मात्र ह्या क्षेत्रामध्ये डांबर प्लँट असल्याचे खोटे पुरावे सादर करून नाशिकच्या आर के सावंत यांनी अनेक ठेके मिळविले आहेत. केव, शिळशेत, नालशेत, ह्या ग्रुप ग्रामपंचयातींनीही आमच्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा डांबर प्लॅन्ट अस्तित्वात नसल्याचा दाखल दिला आहे. या बेकायदेशीर कंत्राटात जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील यांत्रिकी विभागाचे काही अधिकारी सामील आहेत. ह्या खोट्या बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन आजही अनेक ठेके मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या प्रकरणात पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांनी २ जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात विक्रमगड (आलोंडे) येथील मे. हार्दिक कन्स्ट्रक्शनने केलेल्या तक्र ारींचा उल्लेख करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर व जव्हार यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची कंत्राटे मिळविल्याचे नमूद करून. या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मिळविलेल्या ठेक्यांची चौकशी करण्याचे पालक मंत्र्यांनी सुचविले आहे. तरीही कार्यकारी अभियंत्यांनी कारवाई केलेली नाही.
सार्वजनिक विभागाच्या हलगर्जी मुळे जव्हार विभागात येणाऱ्या विक्रमगड आणि इतर तालुक्यातील जवळपास ५५ विकासकामे मान्यते अभावी रखडली असून बोगस कागदपत्रे दाखवून या निविदा भरण्यात आल्या आहेत. आर के सावंत (नाशिक) या नावाने वेगळ्याच ठेकेदारांनी कामे मिळवली असून निविदाहि मंजूर झाल्या आहेत. परंतु या निविदांसोबतची कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असतांनाही दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला कंत्राट देणे क्रमप्राप्त असताना अजूनही तो देण्यात आलेला नाही.किंवा फेर निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार असल्याने कामे तातडीने सुरु करणे गरजेचे असतांनाही ती सुरु केली जात नाहीत. बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यालाच ठेका देण्याचा अट्टाहास सां.बां.चे काही अधिकारी करीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Contracts based on bogus documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.