शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

मीरा भाईंदर : अखेर टेंबा रुग्णालयाचा करारनामा झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 8:28 PM

मीरा भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा) शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी करारनाम्याचा सोपस्कार तब्बल दीड वर्षांनी उरकण्यात आला

मीरा रोड - मीरा भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा) शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी करारनाम्याचा सोपस्कार तब्बल दीड वर्षांनी उरकण्यात आला. कागदोपत्री रुग्णालय शासनाकडे वर्ग झाले असले तरी डॉक्टर, कर्मचारी आदींचा वर्षभर पगार तसेच देखभालीचा खर्च पालिकेलाच करावा लागणार आहे. ४ शस्त्रक्रिया गृहांसह अतिदक्षता विभाग आदी बांधून देणं अजूनही बाकीच आहे. त्यामुळे रुग्णालय शासनाकडून पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी किती महिने लागतील हे अनिश्चित आहे. तर पालिकेला दरम्यानच्या काळात रुग्णालय चालवण्यासाठी काही कोटींचा खर्च सोसावा लागणार आहे. 

शासनाच्या टेंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत २०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी २००६ साली तत्कालिन जनता दल नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्या नंतर वेळकाढुपणा करत का होईना सत्ताधारी व प्रशासनाला रुग्णालय उभारुन नावासाठी तरी सुरू करावे लागले.न्यालयाच्या धास्तीने शस्त्रक्रिया गृहासह अनेक महत्त्वाच्या बाबी नसताना देखील सत्ताधारी भाजपा युती व प्रशासनाने जानेवारी २०१६ मध्ये मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन उरकले. मात्र शस्त्रक्रियागृहापासून आवश्यक डॉक्टर आदी नसताना देखील सुरु केलेल्या रुग्णालयामुळे गंभीर वा चिंताजनक अवस्थेतील रुग्णांचे जीवघेणे हाल झाले. यातून काही रुग्णांना जीव गमवावा लागला .३० नोव्हेंबर २०१६ रोजी शासनाने आदेश काढुन रुग्णालय हस्तांतरणाचा निर्णय घेतला. रुग्णालयासाठी २५ कोटींची तरतुद शासनाने केल्याचे सांगीतले गेले. मात्र जमिनीसह रुग्णालय इमारत, आतील सर्व यंत्र साहित्य आदी पालिकेने विनामूल्य हस्तांतरीत करायचे ठरले होते. करारनाम्यातील अटिशर्तिंच्या खेळात दीड वर्ष वायफळ गेले. पदनिर्मितीस मान्यता मिळून भरती होत नाही तो पर्यंत रुग्णालय पालिकेने चालवावे या अटीने रखडलेला करारनामा अखेर शासनाने भरतीची जाहिरात काढल्याने मार्गी लागला.२४ मे रोजी आरोग्य विभागाच्या उपसंचालक रत्ना रावखंडे व पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यात भार्इंदर येथील नोंदणी कार्यालयात करार करण्यात आलाय. महसुल नोंदी शासनाचे नाव नोंदवले जाणार आहे. रुग्णालयातील ४४ पैकी ३६ डॉक्टर, कर्मचारी आदिंनी शासन सेवेत वर्ग होण्यास मान्यता दिली आहे. पण वर्षभराचा पगार पालिकेलाच द्यावा लागणार आहे. शिवाय रुग्णालयातले हाउस किपींग , लॉण्ड्री , सिक्युरीटी , औषधं , वीज बील , स्टेशनरी आदी सर्व खर्च सुध्दा पालिकेला करायचा आहे.या सोबतच रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर ४ शस्त्रक्रिया गृह , दक्षता व अतिदक्षता विभाग उभारण्याचा खर्च पालिकेलाच करायचा आहे. उपकरणां पासून अन्य खर्च सुद्ध पालिकेलाच सोसावा लागगणार आहे. आधीच कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या या २०० खाटांच्या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण विभाग, प्रसुती व प्राथमिक उपचार तसेच किरकोळ शस्त्रक्रिया आदी नाममात्र वैद्यकिय सुविधा मिळत आहेत. उपचारा अभावी रुग्णांच्या मृत्यूचे प्रसंग घडले आहेत. एकंदर चांगल्या व माफक वैद्यकिय सेवेपासून शहरातील सर्वसामान्य नागरिक मात्र वंचितच आहेत.