प्रशासनाकडून अपूर्ण रस्त्यावर पूर्णत्वाची पाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:44 IST2018-04-30T02:44:39+5:302018-04-30T02:44:39+5:30
वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण

प्रशासनाकडून अपूर्ण रस्त्यावर पूर्णत्वाची पाटी
सुनिल घरत
पारोळ : वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण झाल्याचा बोर्ड लावून शासन व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. जे काही काम त्याने केले आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.
पावसाळयात तानसा नदीवरील उसगाव, मेढे हे पूल पाण्याखाली जाऊन पलीकडील १५ गावांचा संपर्क तुटतो. याकाळात विध्यार्थी व नोकरदारांची गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ मध्ये ग्रामसडक योजने अंतर्गत भालीवली-निबवली या मार्गाचे काम हाती घेण्यात आहे. या मार्गाच्या कामाचा ठेका मेमर्स वितरांग कंन्स्ट्रशन कंपनी मुंबई यांना देण्यात आले आहे. या कामाचा पूर्ण करण्याचा कालावधी १८ महीने असताना चार वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी तो पूर्ण झालेला नाही. गेल्या चार वर्षात मुंबई अहमदाबाद महामार्गाचे चौपद्रीकरण झाले असताना हा मार्ग का पूर्ण होत नाही, कामाचा दर्जा का राखला गेला नाही, ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी काय कारवाई केली असा सवाल विचारला जात आहे. हा मार्ग अपूर्ण असतानाही, केलेल्या कामाचा दर्जा खराब आहे. खडी न वापरता खडा, व डांबरा बरोबर केमीकल चा वापर केला जात असल्याने हा मार्ग पूर्ण झाला तरी टिकेल का असा सवाल आडणे येथील बबन जाधव यांनी विचारला आहे.