CM uddhav thackeray expresses grief over Virar Covid Hospital Fire Orders investigation | Virar Covid Hospital Fire: विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त; सखोल तपासाचे आदेश

Virar Covid Hospital Fire: विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त; सखोल तपासाचे आदेश

विरार: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. 

आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

...अन् १३ रुग्ण घुसमटून, होरपळून मृत्यूमुखी पडले; कालच लागली होती दुर्घटनेची चाहूल

विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  

विरारच्या तिरुपती नगरमध्ये विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. पहाटे ३.१५ च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती. विरार अग्निशमन दलाच्या वाहनांनी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आग विझवली. रुग्णालयात एकूण ९० रुग्ण उपचार घेत होते. 

Read in English

Web Title: CM uddhav thackeray expresses grief over Virar Covid Hospital Fire Orders investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.