तुंगारेश्वरचा बंद झालेला जिझिया प्रवेशकर पुन्हा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 23:03 IST2019-12-28T23:03:31+5:302019-12-28T23:03:42+5:30

मंदिर, अभयारण्याला भेट द्यायचीय, ४८ रुपये मोजा! भाविकांमध्ये असंतोष, स्थानिक नगरसेवक करणार उपोषण आंदोलन

The closed Jizia entrance of Tungareshwar resumes! | तुंगारेश्वरचा बंद झालेला जिझिया प्रवेशकर पुन्हा सुरू!

तुंगारेश्वरचा बंद झालेला जिझिया प्रवेशकर पुन्हा सुरू!

- मंगेश कराळे 

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून आणि तुंगारेश्वर अभयारण्य फिरायला येणाºया लोकांकडून ४८ रुपये प्रवेश कर घेतला जात असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पूर्वीही ३६ रुपये प्रवेश शुल्क घेतले जात होते, मात्र आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. आता पुन्हा हा जिझिया प्रवेश कर आकारला जात असल्याने भाविक तसेच पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तुंगारेश्वर पर्यटन स्थळाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी येणाºया पर्यटकांना अनेक अन्यायकारक बाबींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. या पर्वतावर पर्यटनाव्यतिरिक्त बालयोगी सदानंद महाराज यांचा आश्रम आहे. या आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर समाज प्रबोधन, बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वर्षभर पर्वतावर भाविकांचा राबता असतो. सध्या या ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांचा राबताही असतो. मात्र त्यांच्याकडून, भाविकांकडून पर्यटन कर म्हणून पैसे वसूल केले जातात. पर्वतस्थळावर लावण्यात आलेल्या झिजिया कराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा आवाज उठवूनही अन्यायकारक झिजिया कर घेणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी भाविकांनी तुंगारेश्वर पर्वतावरील मंदिराच्या दानपेटीत कराच्या पावत्या टाकून नाराजी व्यक्त केली होती.

वसईतील प्रसिद्ध श्री तुंगारेश्वर महादेव व परशुराम तीर्थ येथे हजारो वर्षांपासून लाखो भाविक दर्शनास येतात. राज्य सरकारच्या वन विभागाने येथे येणाºया भाविकांकडून प्रत्येकी ४८ रुपये कर आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रवेश शुल्क भरला नाही तर देवाचे दर्शन घेता येणार नाही, असा जाचक हुकूम लादण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र असंतोषाचे व रोषाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त होत आहे.

वन विभाग अस्तित्वात येण्याआधीपासून तुंगारेश्वर हे प्रसिद्ध मंदिर तुंगारेश्वर अभयारण्यात आहे. वसई तालुक्यातील प्रसिद्ध असे शंकराचे मंदिर येथे असून सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. वसई मार्गाने या ठिकाणी येणाºया भाविकांची प्रवेश शुल्काच्या नावावर अक्षरश: लूट केली जात असल्याची चर्चा आहे. या आश्रमामध्ये औषधी उपचार आणि वनौषधी दिली जात असल्यामुळे रुग्ण सुद्धा या ठिकाणी येतात. सरकार आणि वन विभाग ४८ रुपयांचे प्रवेश शुल्क घेते खरे, परंतु येणाºया लोकांसाठी काय सुविधा देतात? येणाºया-जाणाºया लोकांसाठी साधे शौचालयसुद्धा बांधलेले नाही. असे असताना ४८ रुपयांचा जिझिया कर कशाला घेता? हा प्रश्न येथे येणाºया भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षीतिज ठाकूर यांनी प्रवेश शुल्काबाबत आवाज उठवल्यानंतर वन विभागाने हे शुल्क घेणे बंद केले होते. पण परत त्यांनी प्रवेश शुल्क सुरू केल्याने याविरोधात मी लवकरच आमरण उपोषणाला बसणार आहे. प्रवेश शुल्क घेऊन सुद्धा रस्ता, पिण्याचे पाणी, स्वछतागृह यांची कोणतीही मूलभूत सुविधा देत नसल्याने नेमके पैशाचे वन विभागाकडून काय केले जाते?
- रमेश घोरकाना, नगरसेवक, बविआ

अनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण काहीही उपयोग नाही. प्रवेश शुल्काच्या नावावर ४८ रुपये भाविकांकडून घेतले जातात. मात्र काहीही सुविधा देत नाहीत. मग कर कसला घेता? मंदिराकडे येण्या-जाण्यासाठीचा रस्ता सुद्धा मंदिर प्रशासन देणगीतून करत आहे.
- पुरुषोत्तम पाटील,
अध्यक्ष, तुंगारेश्वर देवस्थान

शंकराचे प्रसिद्ध मंदिर, कुंड आणि सदानंद महाराज यांचा आश्रम असल्यामुळे आम्ही नेहमी तुंगारेश्वरला जातो. पण कोणतीही सुविधा नसताना भाविकांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरू असलेली लूट कधी थांबणार?
- नितेश रोखीत, भाविक

Web Title: The closed Jizia entrance of Tungareshwar resumes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.